Breadcrumb

Bhartiya Arthvyavastha | Indian Economy | Marathi Edition

Bhartiya Arthvyavastha | Indian Economy | Marathi Edition

Author : Vivek Singh

(0 Reviews)
  • ISBN : 9789369588299
  • Pages : 456
  • Binding : Paperback
  • Language : Marathi
  • Imprint : S Chand Publishing
  • © year : 2025
  • Size : 8”x10.5”

Price : 650.00 520.00

भारताच्या अर्थव्यवस्थेवर आधारित हे पुस्तक UPSC तसेच राज्यस्तरीय MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एक संपूर्ण मार्गदर्शक ठरेल. परीक्षेच्या दृष्टीने स्थिर व संकल्पनात्मक विषयांसह चालू आर्थिक घडामोडींचा समतोल साधत सखोल समज विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2024-25 च्या आर्थिक पाहणी व 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा समावेश केल्यामुळे हे पुस्तक अद्ययावत व परीक्षेस उपयुक्त आहे.

संपूर्ण अभ्यासक्रमाचा सखोल आढावा घेण्यासाठी पुस्तकात सोप्या भाषेत मूलभूत संकल्पनांचे स्पष्टीकरण दिले आहे. नकाशे, आलेख, प्रवाहचित्रे आणि उदाहरणे यांचा उपयोग करून संकल्पनांचे स्पष्टीकरण स्पष्ट व सहजसाध्य केले आहे. हे पुस्तक फक्त UPSC परीक्षेसाठीच नव्हे, तर राज्यसेवा (MPSC), गट-ब व गट-क संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच इतर विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. रिझर्व्ह बँक (RBI), नाबार्ड (NABARD), आणि सेबी (SEBI) परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा विचार करून हे पुस्तक विकसित करण्यात आले आहे, त्यामुळे अर्थशास्त्राशी संबंधित विविध परीक्षांसाठी हे मार्गदर्शक ठरेल.

याशिवाय, पुस्तकात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर स्वतंत्र प्रकरण देण्यात आले आहे, जे राज्यस्तरीय परीक्षांसाठी विशेषतः उपयुक्त ठरेल. महत्त्वाच्या संकल्पना ठळक अक्षरात देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे जलद पुनरावलोकन शक्य होते.

ही सुधारित आवृत्ती विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या मागणीनुसार विकसित करण्यात आली आहे. हे पुस्तक तुमच्या यशाच्या मार्गावर विश्वासार्ह साथीदार ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे.

पुस्तकाची वैशिष्ट्ये:

🔹 केंद्र शासनाच्या 2025 26 च्या अंदाजपत्रकाचा समावेश आणि 2024 25 च्या आर्थिक पाहणीचा समावेश
🔹 अद्ययावत सांख्यिकी आकडेवारीचा समावेश
🔹 मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा समावेश
🔹 रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सेबीच्या अहवालांचा समावेश
🔹 परीक्षेभिमुक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश
🔹 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा समावेश

अनुक्रमणिका

1 अर्थशास्त्राची ओळख
 

 
  • Eco survey 2023-24 
  • सेवा - वाढीच्या संधींना चालना 
  • सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) म्हणजे काय ? 
  • राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप 
  • वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय ? 
  • दरडोई उत्पन्न म्हणजे काय ? 
  • वास्तविक जीडीपी व्याख्या 
  • जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय ? 
  • जीडीपी आणि पीपीपी दरम्यान संबंध 

2 अर्थशास्त्र म्हणजे नक्की काय ?  
 
  • अर्थशास्त्राचा अर्थ 
  • उत्पादनाचे घटक 
  • अर्थशास्त्राच्या शाखा 
  • अर्थशास्त्राच्या इतर शाखा 
  • अर्थव्यवस्थेचे प्रकार
  • वस्तू आणि त्यांचे प्रकार 

3 मानव विकास 
 
  • आर्थिक वाढ म्हणजे काय? 
  • आर्थिक विकास म्हणजे काय ? 
  • मानव विकास अहवाल 
  • भारत HDI ट्रेंड 
  • लिंग असमानता निर्देशांक
  • भारतातील गरिबी निर्मूलन कार्यक्रम 
  • जागतिक बँक दारिद्र्यरेषा 

4 बेरोजगारी 
 
  • बेरोजगारी म्हणजे काय ? 
  • राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) सर्वेक्षणे 
  • भारतातील बेरोजगारीची कारणे 
  • भारतातील बेरोजगारीचा दर
  • नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS 2024) 
  • भारतातील बेरोजगारीचे मोजमाप 
  • भारतातील बेरोजगारी मोजण्यात आव्हाने

5 आर्थिक वाढ आणि विकास 
 
  • विकासाच्या अर्थशास्त्राचे स्वरूप
  • आर्थिक वाढ आणि तिचे महत्त्व 
  • गरिबी म्हणजे काय? 

6 भारतीय नियोजन आणि नियोजनाशी संबंधित समस्या 
 
  • स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय अर्थव्यवस्था
  • स्वातंत्र्यानंतरची भारतीय अर्थव्यवस्था 
  • आर्थिक नियोजन 
  • भारतातील नियोजनाचा इतिहास 
  • बॉम्बे प्लॅन
  • गांधीवादी योजना 
  • आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे 
  • पंचवार्षिक योजना
  • नियोजनाचे प्रकार 
  • नीती आयोग 

7 सार्वजनिक वित्त 
 
  • अर्थसंकल्प 

8 वित्तीय बाजार 
 
  • आर्थिक बाजार मनी मार्केट म्हणजे काय ? 

9 पैसा 
 
  • मुद्रेच्या पुरवठ्याचा अर्थ व संकल्पना 
  • ऐतिहासिक पार्श्वभूमी - पैशाची संकल्पना कशी विकसित झाली?
  • पैशाचे प्रकार 
  • रिझर्व्ह बँकेची पैशाच्या पुरवठ्याची मापनपद्धती
  • पैसे पुरवठ्याचे घटक 
  • पैसागुणक 
  • बँकिंग प्रणालीदवारे पैशाची निर्मिती
  • भारतातील बेरोजगारीचा परिणाम 
  • भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारचे उपक्रम
  • मनी सृष्टीचे निर्धारक 
  • कायदेशीर निविदा मनी 

10 बँकिंग व्यवस्था 
 
  • बँकेची व्याख्या 
  • स्वातंत्र्यपूर्व काळातील बँकिंगचा इतिहास 
  • अनुसूचित बँका 
  • भारतातील बँकिंग प्रणालीची रचना 
  • प्रादेशिक ग्रामीण बँक (Regional Rural Banks - RRBs) 
  • लघु वित्त बँका (Small Finance Bank) 
  • देय बँका (Payments Bank) 
  • परकीय बँका (Foreign Banks) 
  • व्यापारी बँकांची कार्य 
  • Prime Lending Rate 
  • Base Rate 
  • Marginal Cost of Funds Based Lending Rate 
  • External Benchmark Lending Rate 
  • पतनिर्मिती करणे 
  • बासेल नॉर्म्स 

11 रिड़ाव्र्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 
 
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चा इतिहास 
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे राष्ट्रीयीकरण 
  • आरबीआयचे केंद्रीय संचालक मंडळ 
  • आरबीआयचे स्थानिक मंडळे 
  • पतनियमन करण्याची साधने 
  • आरबीआयच्या शाखा आणि कार्यालये 
  • आरबीआयची प्रकाशने 
  • आरबीआयचे उत्पन्न आणि खर्च 
  • आरबीआय अधिशेष हस्तांतरण जारी करणे 

12 महागाई 
 
  • महागाई म्हणजे काय ? 
  • महागाईचे प्रकार 
  • ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) 
  • घाऊक किंमत निर्देशांक (WPI) 
  • घाऊक किंमत निर्देशांक (WPI) विरुद्ध ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) 
  • उत्पादक किंमत निर्देशांक (PPI) 
  • महागाईचा परिणाम 
  • स्टेंगफ्लेशन

13 भारतातील जमीन सुधारणा 
 
  • जमीन सुधारणा काय आहेत? 
  • जमीन सुधारणांचा इतिहास 
  • जमीन सुधारणांचे घटक 
  • भूदान चळवळ म्हणजे काय? 
  • ग्रामदान चळवळ 
  • सहकारी शेती 
  • भारतीय शेतीची परिस्थिती 
  • आर्थिक सर्वेक्षण 2021-22 कृषी आणि अन्न व्यवस्थापन 
  • भारतीय शेतीच्या समस्या 
  • पीक पद्धती 
  • प्रमुख अन्न पिके 
  • प्रमुख नगदी पिके 
  • मुख्य लागवड पिके 
  • प्रमुख फायबर पिके 
  • भारताचे बदलते पीक पद्धती 
  • भारतातील प्रमुख पिके 
  • भारतातील फलोत्पादन 

14 कृषी व संलग्न घटक 
 
  • पीक पद्धतीचे प्रकार 
  • मशागतीचे प्रकार 
  • पीक पद्धती - प्रकार 
  • विविध प्रकारच्या शेती पद्धती, प्रकार 
  • शाश्वत शेती 
  • सेंद्रिय शेती 
  • पाटबंधारे आणि पाटबंधारे प्रणालीचे प्रकार 
  • भारतातील सिंचन योजना 
  • पर्जन्य क्षेत्र विकास कार्यक्रम (RADP) 
  • सेंद्रिय वि. अजैविक खते 

15 कृषी उत्पादनाची वाहतूक आणि विपणन 
 
  • कृषी विपणन 
  • राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) 
  • मॉडेल एपीएमसी कायदा 2017 
  • अत्यावश्यक वस्तू कायदा (ECA), 1955 
  • किमान आधारभूत किंमत (MSP) 
  • WTO आणि कृषी अनुदान 
  • भारतीय शेतीमधील शेती अनुदानाचे प्रकार 
  • विविध योजनांद्वारे यंत्रसामग्रीसाठी अनुदान
  • निर्यात अनुदान 
  • भारतातील निर्यात योजना 
  • WTO आणि कृषी अनुदान 
  • भारतीय शेतीमधील किमान आधारभूत किंमती 
  • सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS)
  • पीडीएसशी संबंधित योजना 
  • भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग 
  • शासनाचे प्रमुख उपक्रम अन्न प्रक्रिया क्षेत्र 

16 आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना 
 
  • आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना म्हणजे काय? 
  • प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) 
  • जागतिक बँक आणि जागतिक बँक गट (WBG) 
  • जागतिक व्यापार संघटना (WTO)
  • गुंतवणूक मॉडेल्स 
  • गुंतवणुकीचे वर्गीकरण 
  • सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) आणि त्याचे मॉडेल्स 

17 कर संरचना 
 
  • लाफर वक्ररेषा 
  • प्रत्यक्ष कर मूल्यवर्धित कर (Value Added Tax - VAT) ]
  • अबकारी कर / उत्पादन शुल्क 
  • सीमा शुल्क / कस्टम ड्यूटी 
  • विक्री कर 

18 आंतरराष्ट्रीय व्यापार व संकल्पना 
 
  • ओपन इकॉनॉमी आणि क्लोज्ड इकॉनॉमी 
  • Balance of Payments (BOP) 
  • भारतातील गुंतवणूक 
  • थेट विदेशी गुंतवणूक (FDI) 
  • विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) 
  • Devaluation (अवमूल्यन) 
  • चलनाचे अवमूल्यन (Depreciation of Currency) 
  • वास्तविक विनिमय दर 
  • एसएस तारापोर समिती 

19 आर्थिक सर्वेक्षण 2024-25 
20 अर्थसंकल्प 2025-26

 

खालील परीक्षांसाठी उपयुक्त,

📌 राजपत्रित नागरी सेवा पूर्व व मुख्य परीक्षा
📌 अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा
📌 इतर विभागीय स्पर्धा परीक्षा
📌 महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या परीक्षांसाठी उपयुक्त

Be the first one to review

Submit Your Review

Your email address will not be published.

Your rating for this book :

Sign Up for Newsletter